nashik.nic.in


ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोणातुन कुंभमेळाअवकाशात भ्रमण करणारे ग्रहतारे व त्यांची विशिष्ट युती याचा ज्योतिषशास्त्रीयदृष्टया कुंभमेळयाशी संबंध आहे. वेंदा मध्ये ‘सुर्याला’ आत्मारुपी अथवा जिवनदायी मानले जाते ‘चंद्रला’ मनाचा राजा मानले आहे. ‘गुरु/बहस्पती’ ग्रहाला देवांचा गुरु मानले जाते. ‘गुरु’ ग्रहाला बारा राशीमध्ये भ्रमण करण्यासाठी 12 वर्ष लागतात आणि कुंभमेळा देखिल गुरु ग्रहाच्या विविध राशीमधील प्रवेशा नुसार चार ठिकाणी दर 12 वर्षांनी संपन्न होतो. ज्यावेळी गुरुचा ‘कुंभ’ राशीत प्रवेश होतो त्यावेळेस हरिव्दार येथे कुंभमेळा संपन्न होतो.
ज्यावेळी गुरुचा मेष राशीत प्रवेश होतो, व सुर्य आणि चंद्र मकर राशित प्रवेश करतात त्यावेळी अलाहाबाद येथे कुंभमेळा संपन्न होतो.
ज्यावेळी गुरुचा सिंहराशित प्रवेश होतो व सुर्य आणि चंद्र कर्कराशीत प्रवेश करतात त्यावेळेस नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी तिरी सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होतो.
ज्यावेळी गुरु सिंह राशीत व सुर्य आणि चंद्र मेष राशीत प्रवेश करतात त्यावेळेस उज्जैन येथे क्षिप्रातीरी कुंभमेळा संपन्न होतो.
गुरुचा सिंहराशीत प्रवेश झालेला असतांना त्र्यंबकेश्वर-नाशिक व उज्जैन येथे कुंभमेळा संपन्न होत असल्याने त्यास ‘सिंहस्थ कुंभमेळा’ असे संबोधले जाते.
Top