स्वच्छता मोहिम

पुण्यभूमी नाशिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे तशी आपल्या सौंदर्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. गोदामाईचा प्रवाह या सौंदर्यात भर घालणारा आहे. शहरातील अनेक पर्यटनस्थळांमुळे शहर आणि जिल्ह्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील सातत्याने वाढते आहे. शहरीकरणामुळे शहराचा विस्तारही होत आहे. मात्र या बदलांसोबत येणारी नागरिकरणाची प्रक्रीया आणि त्याचा जणू अविभाज्य भाग वाटावी अशी घनकचऱ्याची समस्या यासोबत विस्तारली जाताना दिसते.

प्रामुख्याने प्लास्टिक आणि काच या अविघटनशील पदार्थांच्या अतिरेकी वापरामुळे या समस्येचे रूप अधिक व्यापक होत आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जागृती निर्माण करण्यासाठी आणि ज्या गोदवारीतील पवित्र स्नानासाठी देशविदेशातील भावीक आणि साधूमंहंत येथे येतात त्या गोदामाईतील प्रदूषण दूर करण्यासाठी ‘हरितकुंभ’ची संकल्पना समोर आली आहे. यावर्षी जिल्हा प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळा ‘हरितकुंभ’ म्हणून ओळखला जावा असे प्रयत्न सुरू केले आहेत.

गोदावरीला केवळ नदी नव्हे तर एक संस्कृतीच्या रुपात पाहिले जाते. त्यामुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीचा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसावा तसेच जगभरातील भाविकांच्या माध्यमातून नाशिकच्या स्वच्छतेचा लौकीक सर्वदूर पोहोचावा यासाठी गोदवारी स्वच्छता अभियानही राबविण्यात येत आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित गोदावरी स्वच्छता अभियानाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने गोदावरी किनाऱ्याचे रुप पालटले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे अभियानात 20 हजार आबालवृद्धांनी सहभाग घेतला. संपूर्ण अभियानात सुमारे 375 टन कचरा उचलण्यात आला.

मोहिमेला सकाळी 7 वाजता प्रारंभ झाला. गोदावरी, नासर्डी आणि वाघाडी नदीच्या 10 किलोमीटर परिसरात शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधींनी नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता कार्य केले. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आबालवृद्ध या मोहिमेत सहभागी झाले.

विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह आणि आयुक्त डॉ.प्रविण गेडाम हे सपत्नीक अभियानात सहभागी झाले. पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन्  आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनीदेखील सतत तीन तास स्वच्छतेचे कार्य केले.

लोकप्रतिनिधींनीदेखील या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले. खासदार हेमंत गोडसे, , आमदार सीमा हिरे, , महापौर अशोक मुर्तडक,  उपमहापौर गुरुमीतसिंग बग्गा यांनी यावेळी श्रमदान केले. भैय्यूजी महाराज आणि श्री ग्यानदास महाराज यांनीदेखील उपस्थित राहून स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला. 
nashik.nic.in


nashik.nic.in

मोहिमेत वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसमवेत चिन्मय उद्गीरकर आणि धनश्री क्षिरसागर यांच्यासारख्या कलाकारांनी सहभाग घेतल्याने अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा उत्साह वाढला. जिल्हा परिषद, महानगरपालिका, शासनाचे विविध विभाग आणि सेवाभावी संस्था अशा एकूण 112 पथकांनी घेतलेला सहभाग हे अभियानाचे वेगळे वैशिष्ट्य ठरले. सर्व शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांनी 7 ते 11 या वेळेत स्वच्छतेचे काम उत्स्फूर्तपणे केले. सहभागी होणाऱ्या अनेक स्वच्छतादूतांना स्वत:सोबत पावडी, काटेरी पंजा, गोण्या, झाडू, तगारी आदी साहित्य आणले होते.
महापालिकेतर्फे कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र घंटागाड्या विविध ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. साधारण दहा किलोमीटर क्षेत्रातील 60 पेक्षा अधिक ठिकाणी विविध संस्था आणि समूहांना स्वच्छतेसाठी नेमण्यात आले होते. सर्व वरिष्ठ अधिकारी ठिकठिकाणी जाऊन नागरिकांचा प्रोत्साहीत करीत होते. श्री.डवले आणि श्री.कुशवाह यांनी याठिकाणी नदीपात्रात उतरून श्रमदान केले.
एकूण 20 जेसीबी, 8 डंपर, एक रोबोट, एक पोकलँड आणि 6 ट्रॅक्टरांचा उपयोग अभियानासाठी करण्यात आला. स्वच्छ करण्यात आलेल्या कचऱ्यात प्लास्टिक आणि जुन्या कपड्यांचे प्रमाण जास्त होते. मेळा अधिकारी रघुनाथ गावडे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उदय किसवे, मनपा उपायुक्त रोहिदास जोरकुळकर आदींनी अभियानाचे नियोजन केले. 
जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेतर्फे शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध संस्था आणि नागरिकांना धन्यवाद दिले आहे. जनतेचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा अधिक आणि उत्स्फूर्त असून अशा अभियानाच्या माध्यमातून कुंभमेळ्यापर्यंत गोदावरीचे प्रदूषण दूर करण्यात यश येईल, असा विश्वास श्री.डवले यांनी व्यक्त केला. 
nashik.nic.in
सेवाभावनेने नाशिकच्या जनतेने एकत्र येऊन केलेले हे कार्य इतरही नागरिकांसाठी तसेच देशातील इतर भागातील नागरिकांसाठीदेखील आदर्श आहे, अशी भावना जिल्हाधिकारी श्री.कुशवाह यांनी व्यक्त केली. केवळ एक टक्के जनता नदी किनारी आल्यावर एवढे मोठे कार्य शक्य झाले आहे. या कार्यपासून प्रेरणा घेत पुढल्या अभियानात यापेक्षा अधिक नागरिक सहभागी होतील आणि गोदावरी संपूर्णपणे स्वच्छ ठेवण्यात प्रशासनाला यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
nashik.nic.in
त्र्यंबकेश्वर येथेदेखील शासकीय विभाग तसेच नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी, संदीप फाऊंडेशन, ब्रह्मा व्हॅली आदी संस्थांच्या कर्मचारी-विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. मोहिमेअंतर्गत संपूर्ण शहरातील परिसर स्वच्छ करण्यात आला.
याच अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 1 जुलै रोजी 50 हजार अधिकारी, कर्मचारी  आणि नागरिकांच्या सहकार्याने तसेच विविध संस्थांच्या सहभागातून जिल्ह्यात 5 लक्ष झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रशासनाने त्यादृष्टीने नियेाजन केले  आहे. याच दिवशी शहरातील प्लास्टिकचा कचरादेखील उचलण्यात येणार आहे. अनेक संस्था स्वत:हून या उपक्रमात मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.
nashik.nic.in

nashik.nic.in
पर्यटनवाढीच्यादृष्टीनेही स्वच्छतेचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळ आहेत. कुंभमेळ्यासाठी येणारा भाविक या स्थळांना भेट देण्यासाठी जाणारच. या प्रवासात त्याला सर्वत्र स्वच्छ आणि सुंदर वातावरण दिसले तर तोच आपला पर्यटनदूत म्हणून कार्य करेल आणि नाशिकचे सौंदर्य इतरांसमोर मांडेल. यातूच पर्यटनाला अधिक चालना मिळू शकते. आज जागतिक स्तरावरही ‘ग्रीन टुरिझम’ ची संकल्पना पुढे येत आहे. पर्यावरणस्नेही स्थानांनाच पर्यटकांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. याचाही विचार कुंभमेळ्याच्या निमित्ताने व्हावा असा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
nashik.nic.in
स्वच्छता ही एक चळवळ आणि सवय व्हावी, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नाशिक खरोखर ‘स्मार्ट’ शहर व्हावे यासाठी जनतेचा सहभाग घेऊन हरितकुंभ उपक्रम राबवण्यिात येत आहे. श्रद्धा आणि भक्तीची ही पर्वणी सर्वांच्या सहकार्याने स्वच्छतेची पर्वणी ठरल्यास जगाला नाशिकचे एक अनोखे रुप पाहायला मिळेल. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणून याच दिशेने माझे आणि माझ्या सहकार्यांचे प्रयत्न आहेत.

nashik.nic.in
nashik.nic.in

वृक्षारोपण
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रशासनातर्फे जिल्ह्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण  आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेस नागरिकांसह, स्वयंसेवी-सामाजिक-शैक्षणिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोहिमे अंतर्गत 6 लाख 28 हजार 601 रोपे लावण्यात आली. तर सुमारे 4 लाख 19 हजार बियांची लागवड करण्यात आली.
पार्श्वभूमी:
सिंहस्थ कुंभमेळा ‘हरितकुंभ’ म्हणून साजरा करण्यात यावा यावर प्रशासनाने अधिक भर दिला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे प्लास्टिक कॅरीबॅगवर बंदी, गोदवारी स्वच्छता यासारखे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.  जागतिक पर्यावरण दिनी आयोजित करण्यात आलेल्या गोदवारी स्वच्छता मोहिमेस नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत एका दिवसात 375 टन कचरा एकत्रित केला. हाच उत्साह कायम ठेवण्यासाठी तसेच नाशिकचे ‘हरित’ रुप अधिक ठळकपणे येणाऱ्या भाविकांसमोर ठेवले जावे यासाठी प्रशासनाने स्वच्छता मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले.
नियोजन:
मोहिमेची आखणी करण्याची जबाबदारी अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली. त्यांच्या सहकार्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी देण्यात आले. नियोजनासाठी टीम तयार करण्यात आली. त्यात  वृक्षारोपण क्षेत्राचा अनुभव असलेल्या नागरिकांचादेखील सहभाग होता.
या टीमने नाशिक शहराचे सर्वेक्षण करून वृक्षारोपण करण्यासाठी जागा निश्चित केली. त्याप्रकारे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायत आदी क्षेत्रातील मोकळ्या जागेची माहिती घेतली. त्यानुसार किती रोपे लागतील यांची संख्या निश्चित करण्यात आली. वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, महानगरपालिका आणि खाजगी नर्सरीजकडीली रोपांची उपलब्ध संख्येची माहिती घेऊन आवश्यक रोपांची व्यवस्था करण्यात आली.
जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सामाजिक, औद्योगिक, सेवाभावी, शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत वृक्षारोपणाबाबत आवाहन करण्याबरोबरच रोपे उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांकडून माहिती संकलीत करण्यात आली. वृक्षारोपणासाठी पुढे आलेल्या संस्थांना जागा निश्चित करून खड्डे तयार करण्याच्या सुचना करण्यात आल्या. मोहिमेच्या दिवसापर्यंत जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांनी सातत्याने दूरध्वनीवरून विविध संस्थांना मोहिमेसाठी प्रेरित करण्याचे कार्य केले. मोहिमेचा दुसरा भाग म्हणून वृक्षारोपण होत असलेल्या परिसरातील प्लास्टीक  कचार उचलण्याचे आवाहनही याचवेळी करण्यात आले.
मोहिमेच्या एक दिवस पूर्वी पालकमंत्री गिरीष महाजन यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची स्वंतत्र बैठक घेऊन त्यांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. दुचाकी असलेल्यांनी एक आणि चारचाकी असलेल्यांनी किमान देान झाडे आपल्या परिसरात लावावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी केले.
यशस्वी मोहिम:
मोहिमेचा शुभारंभ गोल्फ क्लब येथे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आला. यावेळी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, विभागीय  आयुक्त्‍ एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, महापालिका आयुक्त्‍ डॉ.प्रविण गेडाम, पोलीस आयुक्त्‍ एस. जगन्नाथन आदी उपस्थित होते.

nashik.nic.in


nashik.nic.in

श्री.राजेंद्र सिंग यांनी विश्व जलशांती अभियानाचा शुभारंभ देखील नाशिक येथूनच केला. नाशिकच्या सांस्कृतिक भूमीत कुंभमेळ्यासारखा मोठा सोहळा होणार आहे. त्यानिमित्ताने नाशिकमध्ये नदी प्रदुषण रोखण्याचे प्रयत्न प्रशासनामार्फत होत आहे. त्यामुळेच आपली विश्व जलशांती यात्रा नाशिकपासून सुरू करीत आहोत, असे त्यांनी  यावेळी सांगितले. शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे पर्यावरण संतुलित करण्याच्या प्रयत्नांना आणि हरितभूमीचे स्वप्न साकार करण्यास मदत होईल, असे सांगून त्यांनी या अभियानाबद्दल कौतुकोद्गार काढले.
उद्घाटनानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते केटीएचएम कॉलेज, संदर्भ रुग्णालय, आडगाव नाका, सय्यद पिंपरी आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. पालकमंत्र्यांनी स्वत: स्वच्छतेच्या कामात सहभाग घेतला. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी आणि नागरिक  उत्स्फुर्तपणे मोहिमेत सहभागी झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.
ग्रामीण भागात तेवढ्याच व्यापक प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. नाशिक ते त्र्यंबकेश्वर पट्ट्यात जिल्हाधिकारी स्वत: श्री.राजेंद्र सिंग यांच्या समवेत स्वयंसेवकांचा उत्साह वाढवित सायंकाळपर्यंत या कार्यक्रमात सहभागी झाले.
सह्याद्री पर्वतातील डोंगराचे सौंदर्य वृक्षलागवडीने बहरावे यासाठी खाजगी उद्योग, स्वयंसेवी संस्था व शासनाने संयुक्त उपक्रम हाती घेत खंबाळा येथील डोंगरावर दीड लाख वृक्ष लागवडीचा उपक्रम या दिवसापासून हाती घेतला.  सॅमसोनाईट एशिया, तैनवाला फेडरेशन व वनविभागाने 7 वर्षात वृक्षलागवड आणि संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे.  जवळपास दिड कोटी रूपये खर्च करून संपुर्ण सव्वाशे एकर क्षेत्राला संरक्षित जाळी लावण्यात येणार असून येथे उपजातीची झाडे लावली जातील.

nashik.nic.in

पहिल्या वर्षी 55 हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत. येथील हिरव्यागार डोंगरावर विद्यार्थी रोपे लावत असतांनाचे चित्र जणू भविष्यातील हिरव्या धरतीची साक्ष देणारे होते. अनेक वृत्तपत्रातून हे छायाचित्र प्रकाशित झाले.

 

nashik.nic.in
nashik.nic.in

उत्तम नियोजनामुळे वृक्षारोपण मोहिम यशस्वी
जिल्ह्यातील 1927 ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. तर 1466 ठिकाणी स्वच्छता उपक्रमांतर्गत प्लास्टिक व इतर कचरा एकत्रित करण्यात आला.  यात माळरान, वन जमीन, डोंगर, शाळा, रुग्णालये, शासकीय कार्यालये, रस्त्याच्या बाजूची जागा, नदी किनार, उद्योग परिसर आदी विविध जागांचा समावेश होता. 92 हजार 578 नागरिक, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला.  3 हजार किलो प्लास्टीक कचरा एकत्रित करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
मोहिमेतील जिल्हा परिषदेचा सहभाग लक्षणीय ठरला. जिल्हा परिषदेतर्फे 4 लाख 29 हजार झाडे लावण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी उत्तम नियोजन करण्याबरोबरच अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.  महापालिका आणि इतर शासकीय विभागांनीदेखील आपल्या स्तरावर नियोजन करून उपक्रमात सहभाग घेतला. महापालिकेने गोदावरी नदीच्या किनारी 10 ते 15 फुटी नारळाची झाडे केरळमधून आणून लावल्याने नदी किनाऱ्याच्या सौंदर्यातही भर पडली.
nashik.nic.in
nashik.nic.in
nashik.nic.in
विविध संस्था आणि शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभागदेखील मोहिमेच्या यशात महत्वाचा ठरला. पालकमंत्री गिरीष महाजन आणि जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांची उपस्थिती स्वयंसेवकांसाठी  प्रेरक ठरली आणि सामुहिक प्रयत्नातून मोहिम यशस्वी झाली.


 

Top Of Scroll

 

Top